breaking-newsराष्ट्रिय

आरबीआयने वर्षभरात एकही २ हजाराची नोट छापली नाही

नवी दिल्ली – २०१९-२० या आर्थिक वर्षात भारतीय रिझर्व्ह बँकेने २ हजाराची एकही नोट छापलेली नाही. याशिवाय या वर्षात भारतीय चलनातून २ हजारांच्या नोटांचे प्रमाणही कमी केले आहे. ही माहिती आरबीआयनेच आपल्या वार्षिक अहवालात दिली आहे.

२०१८ अखेरपर्यंत २ हजाराच्या ३३ हजार ६३२ लाख एवढ्या नोटा भारतीय चलनात होत्या. मात्र मार्च २०१९पर्यंत त्यांची संख्या ३२ हजार ९१० लाखांपर्यंत कमी केली. मार्च २०२०पर्यंत २ हजाराच्या भारतीय चलनातील नोटांची संख्या २७ हजार ३९८ लाख एवढी खाली आले आहे. म्हणजे मार्च २०२०पर्यंत २ हजाराच्या नोटांमध्ये २.४ टक्के एवढी घट झाली आहे. मार्च २०१९च्या तुलनेत या २ हजारांच्या नोटांच्या संख्येत ३.३ टक्के घट झाली आहे, असे आरबीआयच्या अहवालात नमूद केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button