breaking-newsराष्ट्रिय

“आयएनएक्‍स’ मिडीया प्रकरणी चिदंबरम यांना दिलासा,

  • मात्र सीबीआयकडून कोठडीची मागणीही 

नवी दिल्ली – “आयएनएक्‍स’ मिडीया भ्रष्टाचार प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना अटकेपासून तुर्तास दिलासा मिळाला आहे. मात्र या प्रकरणातील चौकशीसाठी सीबीआयकडून चिदंबरम यांच्या कोठडीचीही मागणीही करण्यात आली आहे. चिदंबरम हे स्वतःचा बचाव करत असून चौकशीला सहकार्य करत नसल्याचे सीबीआयने न्यायालयात सांगितले.

न्या. ए.के. पाठक यांच्यासमोर सीबीआयने या प्रकरणाची सुनावणी 1 ऑगस्टपर्यंत तहकूब ठेवली असून तोपर्यंत चिदंबरम यांना अटक न करण्याच्या सूचनाही कायम ठेवण्यात आल्या आहेत. चिदंबरम यांना अटक न करण्याची सूचना 31 मे रोजीच देण्यात आल्या आहेत. त्यालाच आज मुदतवाढ देण्यात आली.

“आयएनएक्‍स मिडीया’गैरव्यवहार प्रकरणी आतापर्यंत उपलब्ध झालेले पुरावे आणि गैरव्यवहाराचे उघड झालेले गांभीर्य लक्षात घेता चिदंबरम यांची चौकशी कोठडीमध्येच व्हायला हवी, असे सीबीआयने म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button