breaking-newsराष्ट्रिय

आयआरटीसी घोटाळा : राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांना मिळाला जामीन

  • पुढील सुनावणी 19 नोव्हेंबरला होणार

नवी दिल्ली – दिल्लीतील न्यायालयाने शनिवारी राजद पक्षाचे प्रमुख लालू प्रसाद यांची पत्नी राबडी देवी आणि मुलगा तेजस्वी यादव आणि इतरांना आयआरटीसी(इंडियन रेल्वे कैटरिंग अॅण्ड टूरिझम काॅर्पोरेशन) घोटाळा प्रकरणी जामीन दिला आहे.

विशेष न्यायधीश अरूण भारद्वाज यांनी याप्रकरणी राबडी देवी, तेजस्वी यादव व इतर आरोपी यांना 19 नोव्हेंबरपर्यत अंतरिम जामीन दिला आहे. या सर्वाना आजच्या सुनावणी वेळी १ लाख रुपये अमानत रक्कम भरून जामीन मंजूर करण्यात आला. न्यायालयाने निर्देश दिला आहे की, सीबीआय आणि ईडी यांच्याव्दारे दाखल केलेल्या प्रकरणात प्रसाद ला 19 नोव्हेंबर रोजी व्हीडीअो कॉन्फ्रेन्सिंग व्दारे सादर करावे.

यापूर्वी आयआरटीसी घोटाळा प्रकरणी सीबीआयकडून न्यायालयात आरोपपत्र न्यालयात दाखल झाल्यांनतर राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांच्यासह अन्य आरोपींना ३१ ऑगस्ट पासून आजपर्यंत अंतरिम जामीन देण्यात आला होता.

काय आहे आयआरटीसी घोटाळा

आयआरसीटीच्या मालकीची पुरी आणि रांची येथील दोन हॉटेल्स एका खासगी कंपनीला लीज वर देताना त्यात भ्रष्टाचार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ही हॉटेल्स लीजवर दिल्या प्रकरणी त्याचा मोबदला म्हणून पाटण्यातील एक भूखंड राजदचे नेते पी सी गुप्ता यांच्या कंपनीला देण्यात आला. नंतर हा भूखंड हळूहळू राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांच्या नावावर वर्ग करण्यात आला. ही जमीन खरेदी करण्यासाठी जमवण्यात आलेला पैसा खोट्या कंपन्याच्या नावांनी जमा करण्यात आला आहे हे तपासात निष्पन्न झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button