breaking-newsराष्ट्रिय
‘आमदार फोडण्यासाठी भाजपकडून १० कोटींचे आमिष’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/ap.jpg)
नवी दिल्ली : दिल्लीत भाजपने आम आदमी पक्षाचे सात आमदार फोडण्यासाठी प्रत्येकी दहा कोटी रुपयांचे आमिष दाखविले असा आरोप आपचे नेते व दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांनी केला आहे. भाजपने मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे. केवळ प्रसिद्धीसाठी हे आरोप केले जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
भाजपने यापूर्वीही आपचे आमदार फोडण्याचा प्रयत्न केल्याचा दावा शिसोदिया यांनी केला आहे. भाजपकडे विकासाच्या मुद्दय़ावर बोलण्यासारखे काही नसल्याने ते फोडाफोडीचे राजकारण करत असल्याची टीका शिसोदिया यांनी केली आहे. तृणमूल काँग्रेसचे चाळीस आमदार संपर्कात असल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दाव्यावर शिसोदिया यांनी टीका केली. पंतप्रधानांसारख्या व्यक्तीला असे वक्तव्य शोभत नाही, असे शिसोदिया यांनी सांगितले.