breaking-newsराष्ट्रिय

आमच्याकडे केंद्र सरकार हे विसरु नका, येडियुरप्पांचे कुमारस्वामींना उत्तर

कर्नाटकातील सत्ता संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. कर्नाटकात सध्या काँग्रेस-जेडीएस आघाडीचे सरकार असले तरी भाजपाकडून या सरकारला सुरुंग लावण्याचे जोरदार प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे. जेडीएस आणि भाजपामध्ये शाब्दीक युद्ध रंगले आहे. भाजपाने आपले सरकार अस्थिर करण्याचा किंवा पाडण्याचा प्रयत्न केला तर आपण जनतेला बीएस येडियुरप्पा यांच्या विरोधात बंड पुकारण्याचे आव्हान करु असे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी म्हटले आहे.

भाजपा पैशाच्या बळावर आपले सरकार अस्थिर करण्याचा हरतऱ्हेने प्रयत्न करत आहे. भाजपाने हे प्रकार थांबवले नाहीत तर मी जनतेला त्यांच्या विरोधात बंड पुकारण्याचे आव्हान करेन. मी शांत बसणार नाही. त्यांना काय वाटते? त्यांनाच राजकारण कळते ? अशा परिस्थितीत काय करायचे ते मला सुद्धा कळते असे कुमारस्वामी म्हणाले. उदयगिरी हसन येथील कार्यक्रमात ते बोलत होते.

देवेगौडा कुटुंबाने राज्याच्या संपत्तीची लूट चालवली असल्याचा आरोप येडियुरप्पा यांनी केला आहे. येडियुरप्पा सत्ताधारी पक्षातील १५ ते २० आमदारांना फोडून भाजपामध्ये आणतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

येडियुरप्पा तु्म्ही काचेच्या घरात बसून आमच्यावर दगड मारण्याचा प्रयत्न करत आहात. हे सरकार माझ्या हातात आहे हे विसरु नका आणि मी काहीही करु शकतो असा इशारा कुमारस्वामी यांनी येडियुरप्पांना दिला. कुमारस्वामींच्या या इशाऱ्याला उत्तर देताना येडियुरप्पा यांनी गौडा कुटुंबाची सर्व बेकायद कृत्ये उघड करण्याची धमकी दिली. केंद्रात आमचे सरकार आहे हे कुमारस्वामींनी विसरु नये असा सूचक इशारा त्यांनी दिला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button