आपण काही आठवड्यातच परतु – पर्रिकर
पणजी – उपचारासाठी अमेरिकेत गेलेले मनोहर पर्रिकर यांनी आपण काही आठवड्यातच गोव्यात परतणार आहोत असे म्हटले आहे. आपल्या समर्थकांसाठी त्यांनी अमेरिकेतून एक व्हिडीओ संदेश जारी केला असून त्यात त्यांनी आपल्या प्रकृतीत आता चांगली सुधारणा झाली असल्याचे म्हटले आहे. आज येथील एका सभेत पर्रिकर यांचा हा व्हिडीओ संदेश सादर करण्यात आला. या सभेत अमित शहा हेही उपस्थित होते.
ते म्हणाले की आपण त्यांच्याशी फोन वरून संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली त्यावेळी पर्रिकर यांनी कर्नाटकातील निवडणुकीच्या संबंधात आपल्याला माहिती विचारली. प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी प्रथम पक्षाच्या स्थितीविषयी चौकशी करणे हे त्यांच्यातील खऱ्या पक्ष कार्यकर्त्याचे लक्षण असल्याचे शहा यांनी या सभेत नमूद केले. भाजपने आज येथे बुथ पातळीवरील कार्यकर्त्यांचे एक संमेलन आयोजित केले होते. त्यावेळी पर्रिकर यांचा हा व्हिडीओ संदेश जारी करण्यात आला.