Breaking-newsराष्ट्रिय
आदित्यनाथ यांना काळे झेंडे दाखवणाऱ्या 10 जणांना अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/Yogi-Adityanath-ANI-.jpg)
इटवाह – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना काळे झेंडे दाखवल्याबद्दल पोलिसांनी 10 जणांना अटक केली आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ इटवाहच्या दौऱ्यावर आले असताना काही लोकांनी त्यांना काळे झेंडे दाखवले होते, असे परिमंडळ अधिकारी अंजनी कुमार यांनी सांगितले.
घटनास्थळापासून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या 10 जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. या सर्व जणांची वैद्यकीय तपासणी झाल्यावर वैयक्तिक हमीवर सोडून देण्यात आले आहे, असेही पोलिसांनी सांगितले.