breaking-newsराष्ट्रिय

आता जीएसटीच्या सर्वोच्च कर वर्गात फक्त 35 वस्तू

नवी दिल्ली: वस्तू आणि सेवा कर अर्थात “जीएसटी’ संचालक मंडळाने सर्वोच्च कर असलेल्या 28 टक्‍के वर्गातील वस्तूंची संख्या मोठ्या प्रमाणावर घटवण्यात आली असून त्यामुळे आता 28 टक्के स्लॅब मधील वस्तुंची संख्या आत 35 वर आली आहे. या कर वर्गात आता एसी, डिजीटल कॅमेरा, व्हिडिओ रेकॉर्डर, डिश वॉशिंग मशीन आणि वाहन आदीसारख्या 35 उत्पादनांचा समावेश आहे.गेल्या एका वर्षात जीएसटी संचालक मंडळाने सर्वोच्च कर यादीतील 191 वस्तु 28 टक्‍क्‍यांच्या स्लॅबमधून काढून कमी करांच्या स्लॅबमध्ये त्यांचा समावेश केला. हा कर कमी झाल्याने त्याचा देशातील लोकांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे.
केंद्र सरकारने देशभरात 1 जुलै, 2017 रोजीपासून जीएसटी लागू केला होता. त्यावेळी 28 टक्‍के कर असलेल्या वर्गात 226 वस्तूंचा समावेश केला होता. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी कौउसिलने एका वर्षात 191 वस्तूंवरील कर कपात केली आहे. नवीन जीएसटी दर हे 27 जुलैपासून लागू करण्यात येणार आहेत. सर्वोच्च कर वर्गातील 35 उत्पादनांमध्ये सिमेंट, टायर, विमान, मद्य, तंबाकू, सिगारेट आणि पान मसाला यासारख्या वस्तूंचा समावेश आहे. केंद्र सरकारने जीएसटी लागू केला तेव्हा एक देश एक कर अशी घोषणा केली होती पण प्रत्यक्षात जीएसटीची कर रचना पांच वर्गवारीत करण्यात आल्याने त्यावर मोठ्या प्रमाणात आक्षेप घेतला गेला होता. त्यामुळे सरकराने 28 टक्‍क्‍यांच्या स्लॅब मधील कर मोठ्या प्रमाणात कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button