breaking-newsआंतरराष्टीय

आठ वर्षांच्या प्रयत्नांनंतर 600 किलोची मगर जेरबंद

सिडनी- ऑस्ट्रेलियात 2010 साली दिसलेली मगर पकडण्यात यश आले आहे. सुमारे 600 किलो म्हणजे 1328 पौंड वजनाची ही मगर पकडण्यासाठी गेली अनेक वर्षे प्रयत्न सुरु होते. या मगरीची लांबी 4.7 मीटर असून ती कॅथरिन नदीमध्ये 2010 साली दिसली होती. या मगरीचे वय 60 वर्षए असावे असे सांगण्यात येते.

China Xinhua News

@XHNews

4.71-meter-long monster crocodile caught in Australia’s Northern Territory http://xhne.ws/5aMpC 

ही मगर पकडणे अत्यंत अवघड होते, असे येथील वन्यजीव अधिकारी जॉन बुर्क वृत्तसंस्थाशी बोलताना म्हणाले. लोकांपासून ही मगर दूर नेण्यासाठी तिला पकडण्यात आल्याचे समजते. कॅथरिन नदीतून पकडलेली ही सर्वात मोठी मगर असल्याचे वन्यजीव कार्य मोहिमेचे प्रमुख ट्रेसी डलडिग यांनी सांगितले आहे. दरवर्षी येथे 250 मगरी पकडल्या जातात. मगरीच्या हल्ल्यात दरवर्षी 2 व्यक्तींचे प्राण जातात.

people 😔@SabinaKortez

incredible Australian crocs …over 50 on the banks sunbaking

1970 साली मगरींच्या हत्येवर बंदी घातल्यानंतर त्यांची संख्या झपाट्याने वाढत गेली. गेल्या वर्षी एका वृद्ध महिलेचे प्राण मगरीने घेतल्यानंतर मगरींच्या संख्येवर आळा घालण्यात यावा अशी मागणी पुन्हा होऊ लागली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button