अमेरिकेत ज्वालामुखीचा विक्रमी उद्रेक-30 हजार फूट उंच उसळला लाव्हा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/usa-volcano-.jpg)
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेच्या हवाई बेटावरील ज्वालामुखीचा विक्रमी, आजवरचा सर्वात प्रचंड उद्रेक झाला आहे. या उद्रेकामुळे ज्वालामुखीतून निघणारा लाव्हा 30 हजार फूट उंचीपर्यंत उसळला. हवाई बेटावरील किलुआ ज्वालामुखीचा उद्रेक झालानंतर अनेक ठिकाणी जमिनीला भेगा पडल्या आहेत.
यूजीएस (यूएस जिऑलॉजिकल सर्वे) ने या उद्रेकाची माहिती दिली आहे. हवाई बेटावरील किलुआ या ज्वालामुखीचा आजवरचा सर्वात मोठा उद्रेक गुरुवारी झाला. या प्रचंड उद्रेकानंतर आजूबाजूच्या सर्व शहरांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. ज्वालामुखीत बाहेर पडणाऱ्या विषारी वायूंपासून बचाव करण्याबाबत सल्ला देण्यात आला आहे. यातून सल्फर डाय ऑक्साईडसह अनेक विषारी वायू बाहेर पडत आहेत.
गेले अनेक दिवस या ज्वालामुखीतून सुमारे 12 हजार फूट उंचीपर्यंत धूर जाताना दिसत होता. तो पाहिल्यानंतर एका प्रचंड उद्रेकाची सागधगिरीची सूचना अगोदरच देण्यात आलेली होती. ज्वालामुखीतील लाव्हा 10 ठिकाणांहून बाहेर पडत आहे. आणि तो आणखी निघण्याची शक्यता व्यक्तेकरण्यात आली आहे. दहा दिवसांपूर्वीच या ज्वालामुखीत मोठा स्फोट झाला होता. त्यात 32 घरे पूर्णपणे नष्ट झाली होती. सुमारे 2,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. आता या भागात आजवरची सर्वाधिक धोक्याची सूचना जारी करण्यात आलेली आहे.