breaking-newsआंतरराष्टीय

अमेरिका : तीन भारतीय भावंडांचा आगीत होरपळून मृत्यू

अमेरिका : अमेरिकेच्या टेनिसी राज्यातील एका घरी नाताळाच्या दोन दिवस आधी लागलेल्या भीषण आगीत तीन भारतीय भावा-बहिणींसह चार जणांचा होरपळून मृत्यू झालाय. आगीत दुर्दैवी मृत्यू झालेली तिन्ही भावंडे श्रीनिवास आणि सुजाता नाईक या भारतीय दाम्पत्याची मुले आहेत. हे दाम्पत्य भारतात तेलंगणाच्या नलगोंडा जिल्ह्यातील गुरुपुथंडा गावातील आहे.

श्रीनिवास नाईक हे अमेरिकेत पूर्वी चर्चमध्ये पॅस्टर म्हणून काम करायचे. गेल्या वर्षीच ते पत्नीसह भारतात परत गेले; मात्र तिन्ही मुले मिसिसिपी राज्यातील फ्रेंच कॅम्प अकादमीमध्ये शिकत असल्याने ते त्यांना अमेरिकेतच ठेवून गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार, 23 डिसेंबरच्या रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आग लागली. क्वाड्रिएट कुटुंबाच्या घराला ही आग लागली होती. क्वाड्रिएट कुटुंबाने नाताळच्या निमित्ताने नाईक कुटुंबियांना घरी बोलावले होते.

क्वाड्रिएट कुटुंबाच्या संपूर्ण लाकडी घराला रात्री 11 च्या सुमारास आग लागली. घरमालक डॅनी क्वाड्रिएट व त्यांचा 11 वर्षांचा मुलगा कोल हे पेटत्या घराच्या खिडक्यांमधून उड्या टाकून बाहेर पडल्याने सुदैवाने वाचले. पण, कॅरी क्वाड्रिएट (५५ वर्षे), शेरॉन नाईक (17), जॉय नाईक (15) आणि अ‍ॅरॉन नाईक (14) यांचा मृत्यू झाला. दरम्यान, ही आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही मात्र अग्निशमन अधिकाऱ्यांच्या तपासणीत आगीची पूर्वसूचना देणारी यंत्रणा बंद पडली असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, तिन्ही मुलांच्या मृत्यूचे वृत्त कळताच नाईक दाम्पत्य तातडीने अमेरिकेसाठी रवाना झालंय.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button