अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचे सावट, सुरक्षा यंत्रणेत वाढ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/amarnath-yatra-1-696x447-1.jpg)
कश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सैन्याने दिली आहे. त्यासाठी यात्रेची सुरक्षा वाढवण्यात आल्याचे सैन्याने सांगितले आहे.
21 जुलै रोजी अमरनाथ यात्रा होणार आहे. शुक्रवारी हिंदुस्थानी सैन्याने जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्याला कंठस्नान घातले होते. ब्रिगेडियर विवेक सिंह ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवादी अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्यात आली आहे. ही यात्रा पूर्ण सुरक्षितपण पार पाडली जाईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
अमरनाथ यात्रेसाठी 44 क्रमाकांचा महामार्ग वापरला जाईएल असे ब्रिगेडियर ठाकूर यांनी सांगिते. हा मार्ग अजूनही संवेदनशील असून यात्रेकरूंना सोनमार्ग आणि बलटाल भागातून अमरनाथला पाठवण्यात येईल असेही ठाकूर यांनी नमूद केले.