Breaking-newsआंतरराष्ट्रीय
अफगाणिस्तानातील अध्यक्षीय निवडणुकीत हिंसाचार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/09/Untitled-14-17.jpg)
अफगाणिस्तानात अध्यक्षीय निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना स्फोट घडवून ती निवडणूक उधळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या वेळी बंदोबस्तासाठी सर्व रस्त्यांवर सुरक्षा दले तैनात करण्यात आली होती.
अध्यक्ष अशरफ घनी व त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी अब्दुल्ला अब्दुल्ला यांच्यात या निवडणुकीत अटीतटीची लढत होत आहे. निवडणूक प्रचाराच्या दोन महिन्यांच्या काळात तालिबानने अनेक स्फोट घडवून आणले होते. आजही मतदान केंद्रांवर हल्ले करण्याचा इशारा तालिबानकडून देण्यात आला होता.
कंदहार येथे मतदान केंद्रावर करण्यात आलेल्या स्फोटात १५ जण जखमी झाले. शांतता ही आमच्या लोकांची प्राथमिकता आहे, असे घनी यांनी काबूल येथील शाळेत मतदान केल्यानंतर सांगितले. शांततेसाठी आमचा आराखडा तयार आहे, तो राबवण्यासाठी लोकांनी निवडणुकीतून आम्हाला संधी द्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.