breaking-newsराष्ट्रिय

अनुराग कश्यपच्या मुलीला मोदी समर्थकाची बलात्काराची धमकी, मोदींना विचारला प्रश्न

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली  लोकसभा निवडणुकींमध्ये भाजपाला अभूतपूर्व यश मिळाले. दिग्दर्शक अनुराग कश्यप याने या यशाबद्दल पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, त्याच वेळी त्याने माझ्या मुलीला धमकावणाऱ्या तुमच्या समर्थकांना कशाप्रकारे तोंड द्यायचे, हे ही आम्हाला सांगा असाही टोला मोदींना लगावला आहे. मोदींच्या विजयानंतर अनुरागच्या मुलीला ट्विटवरुन एका मोदी समर्थकाने अश्लील भाषेत बलात्काराची धमकी दिली आहे. याच ट्विटचा स्क्रीनशॉर्ट शेअर करत अनुरागने मोदींना सवाल केला आहे.

चौकीदार रामसिंघ नावाच्या ट्विटर अकाऊण्टवरुन करण्यात आलेले अश्लील भाषेतील ट्विट अनुरागने शेअर केलेल्या स्क्रीनशॉर्टमध्ये दिसत आहे. यामध्ये अनुरागच्या मुलीचा फोटो शेअर करत तुझ्या बापाला शांत रहायला सांग, अशी धमकी या व्यक्तीने दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये अनुराग म्हणतो, ‘प्रिय, नरेंद्र मोदी सर, निवडणुकीतील विजयासाठी तुमचे हार्दिक अभिनंदन. सर्वसमावेश विकासाचा मुद्दा आपल्या भाषणातून मांडल्याबद्दल धन्यवाद. तुमच्यात आणि माझ्यात मतभेद असल्याने तुमचे समर्थक माझ्या मुलीली अशाप्रकारे धमक्या देऊन विजयाचा आनंद साजरा करत आहेत. कृपया तुमच्या या अशा समर्थकांशी आम्ही कशाप्रकारे वागावे हे ही तुम्ही आम्हाला सांगा.’

याआधी अनुरागने अनेकदा मोदींवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे टिका केल्याची उदाहरणे आहेत. मात्र वैचारिक मतभेदासाठी माझ्या मुलीला अशाप्रकारे धकम्या येत असल्याबद्दल अनुरागने ट्विटवरुन चिंता व्यक्त केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button