breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

भाजपचा ४०० पारचा नारा खरा ठरणार? एक्झिट पोल समोर

Lok Sabha Election Result 2024 | लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे एक्झिट पोल समोर आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या २०२४ च्या शेवटच्या सातव्या टप्प्यातील मतदान काल संपल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. आतापर्यंत समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपच्या ४०० पार जागांचा दावा तीन एक्झिट पोल खरा ठरण्याचा अंदाज वर्तवला जात आहेत.

सर्व्हेनुसार, भाजपला ३३५ जागांवर विजय मिळू शकतो, तर एनडीएला ४०० जागा मिळू शकतात. याशिवाय काँग्रेसला ५० जागांवर समाधान मानावं लागेल. इंडिया आघाडीला १०७ जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे. तर इतर पक्षांना ३६ जागा मिळू शकतात.

हेही वाचा      –    ‘एक्झिट पोल म्हणजे गुवाहाटीत कापलेल्या रेड्यांसारखा’; ठाकरे गटाची टीका 

टुडेज चाणक्य एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार, भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला ४०० पार जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. चाणक्य एक्झिट पोलनुसार, भाजपला ३३५ जागांवर विजय मिळून शकतो, तर एनडीएला ४०० जागा मिळू शकतात. याशिवाय काँग्रेसला ५० जागांवर समाधान मानावं लागेल. इंडिया आघाडीला १०७ जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे. इतर पक्षांना ३६ जागा मिळू शकतात.

कोणत्याही एक्झिट पोलमध्ये भाजपला स्वबळावर ४०० जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही. भाजपने यावेळी ‘४०० पार’ असा नारा दिला होता. एक्झिट पोलमध्ये भाजप या घोषणेपासून खूप दूर असल्याचे दिसत आहे. पण, काही एक्झिट पोलमध्ये एनडीए ४०० पार घोषणेच्या जवळपास असल्याचं दिसत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button