breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

पराभवानंतर भाजपचा प्लॅन बी, पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवणार?

मुंबई ; राज्यसभेतील खासदारांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याचा प्रयोग यशस्वी ठरला. राज्यात उदयनराजे भोसले, पियुष गोयल आणि नारायण राणे यांनी विजयश्री खेचून आणला. या विजयामुळे हे तिघे ही आता लोकसभेचे प्रतिनिधीत्व करतील. त्यामुळे राज्यातील राज्यसभेच्या जागा रिक्त होतील. गोयल आणि राणे यांना पुन्हा राज्यसभेवर न पाठवता लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा निर्णय योग्य ठरल्याचे निकालातून दिसून आले.   यापूर्वी अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठविण्यात आले आहे. भाजपच्या रिक्त जागांवर कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठविले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हेही वाचा     –    कपिल पाटीलांचा पराभव जिव्हारी, भाजपच्या कार्यकर्त्याची आत्महत्या 

खासदार उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल यांच्या विजयानंतर भाजपच्या राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. या दोन जागांवर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वाचं लक्ष लागले आहे. पंकजा मुंडे या अनेक दिवसांपासून नाराज असल्याचे चित्र होते. त्यानंतर त्यांना पक्षाने राष्ट्रीय पातळीवर सचिवपद देण्यात आलं. लोकसभा निवडणुकीत पक्षानं त्यांना बीडमधून तिकीट दिले. पण तिथे त्यांना परभावाचा सामना करावा लागला.पंकजा मुंडे यांना या जागेवरून राज्यकेरळ आणि महाराष्ट्रातील मिळून चार जागांसाठी 25 जून रोजी राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाने त्याविषयीची घोषणा केली आहे. केरळमधील तीन जागा तर राज्यातील एका जागेसाठी निवडणूक होणार आहे. केरळमधील विद्यमान खासदार एलराम करीम, बिनॉय विस्वम आणि जोस के मणी ते तिघे 1 जुलै रोजी निवृत्त होतील. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राजीनामा दिल्यानं त्यांच्या रिक्त जागेसाठी 25 जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 14 जून आणि नामांकन मागे घेण्याची शेवटची तारीख 18 जून असेल. 25 जून रोजी निवडणूक होईल. तर सायंकाळी मतमोजणी होणार आहे.सभेवर पाठवलं जाण्याची शक्यता आहे. लवकरच भाजप नेतृत्व याबाबतचा निर्णय घेणार आहे.

 

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button