breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करा”; भाजप नगरसेवकाची मागणी

गोपीचंद पडळकर आणि बंधू ब्रम्हानंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करा

मिरज : सांगलीतील मिरजमध्ये मध्यरात्री पाडकाम करण्यात आलं. मध्यरात्री दोन वाजता एसटी स्टॅन्डजवळ हे पाडकाम करण्यात आलं आहे. या पाडकामावर स्थानिकांनी आक्षेप घेतला आहे. भाजपचे विधान परिषदेतेचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनी घर दुकाने पाडली आहेत असा आरोप केला जात आहे.
मिरज शहरात रात्री जेसीबी आणि हजार दोन हजार गुंडांच्या माध्यमातुन जी कारवाई झालेली आहे. पोलीस समोर असताना ही कारवाई झालेली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करा, अशी मागणी भाजप नगरसेवक आनंदा देवमाणे यांनी केली आहे.
सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे आमचे आमदार आहेत. त्यांनी जाहीर करावं की या कृत्यामध्ये त्यांचाही सहभाग आहे का? जर खाडे यांचा या प्रकरणाशी संबंध नसेल तर गोपीचंद पडळकर, ब्रम्हानंद पडळकर आणि त्यांच्यासोबत आलेले दीड-दोन हजार गुंड या सगळ्यांवर योग्य त्या कलमानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी करतो, असं स्थानिक नागरिकांची मागणी आहे.
आज दुपारी 12 वाजेपर्यंत या सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले नाहीत तर आम्ही सगळे लोक आमच्या कुटुंबासह सुरेश खाडे यांच्या कार्यालयाबाहेर उपोषण करू, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे. त्यामुळे मिरज शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button