breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमधील विविध विकासकामांचे भूमिपूजन अन्‌ लोकार्पण

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा : चिखलीतील नूतन टाऊन हॉलमध्ये कार्यक्रम

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते आज करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली येथील आरक्षण क्र. १/१६ येथे उभारण्यात आलेल्या नवीन टाऊन हॉलचे लोकार्पण आणि अन्य विविध विकासकामांचे ऑनलाईन पद्धतीने भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रम शनिवार, दि. ९ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे.

महापलिका प्रशासनाने कार्यक्रमाची तयारी केली आहे. यानिमित्त सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्यसभा सदस्य वंदना चव्हाण खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, विधान परिषद आमदार उमा खापरे, आमदार संग्राम थोपटे, अण्णा बनसोडे, महेश लांडगे, अश्विनी जगताप आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यावेळी चिखली येथील आरक्षण क्रमांक १/१६ मध्ये टाऊन हॉलचे उद्घाटन, महिला बचत गट सक्षमीकरण ‘सक्षमा’ प्रकल्पाचा शुभारंभ, युवक व युवतींच्या रोजगार व प्रशिक्षणाच्या ‘कौशल्यम’ प्रकल्पाचा शुभारंभ आणि त्या अखत्यारितील भोसरी आणि बोऱ्हाडेवाडी केंद्राचे उद्घाटन, नवी दिशा प्रकल्पांतर्गत भोसरी येथील स्टीचिंग युनिटचे उद्घाटन, १७.९ टन प्रतिदिन क्षमतेच्या जैव वैद्यकीय घनकचरा विल्हेवाट प्रकल्पाचे लोकार्पण, कुदळवाडी-जाधववाडी भागातून इंद्रायणी नदीस मिळणाऱ्या नाल्यातील पाण्यावर प्रक्रिया करुन त्याचा पुनर्वापर करणेसाठी प्रक्रिया प्रकल्पाचे लोकार्पण, राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम NCAP अंतर्गत शहरातील अतिप्रदूषित परिसरात Air purification system व dry mist based fountain system, stationary fog cannon units चे लोकार्पण, प्रभाग क्र. ७ भोसरी गावठाणातील स.नं. १ मध्ये कबड्डी प्रशिक्षण केंद्र विकसित करणे, तसेच अनुषंगिक कामाचे उद्घाटन केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पिंपरी-चिंचवड मनपा क्षेत्रात आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी चऱ्होली येथील निवासी सदनिकांचे लोकार्पण निगडी येथील जय ट्रेडर्स समोर पादचारी भुयारी मार्गाचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

… या कामांचे होणार भूमिपूजन

मोशी येथील गट क्रमांक ६४६ मधील गायरान जागेमध्ये उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयाचे भूमिपूजन, मोशी कचरा डेपोतील जुन्या डंपिंग केलेल्या कचऱ्याचे बायोमायनिंग करणे (टप्पा-२) कामाचा शुभारंभ, पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीतील एकूण १२.४ किमी लांबीच्या नवीन डीपी रस्त्याचे भूमिपूजन, प्रभाग क्रमांक ७ भोसरीमधील मनपा शाळेसाठी बांधण्यात येणाऱ्या इमारतीचे भूमिपूजन, निगडी-दापोडी रस्त्याचे अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार विकसन करणे, मुकाई चौक ते चिखली स्पाईन रस्ता विकतिस करणे व अनुषंगिक कामे करणे अंतर्गत त्रिवेणीनगर चौकातील स्पाईन रस्त्याची मिसिंग लिंक रस्ता विकसित करणे, भक्ती-शक्ती ते मुकाई चौक बीआरटी कॉरिडॉर विकसित करणेची उर्वरित कामांचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button