breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘मैं हूँ बार्बी गर्ल’ म्हणत बार्बीची जगभरात ८२७० कोटी रूपयांची कमाई

मुंबई : ‘मैं हूँ बार्बी गर्ल’ म्हणत बार्बीने जगभरातील बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगलाच धुमाकूळ घातल आहे. दुसरीकडे ओपनहायमर या हॉलिवूडपटाचा धमाका असूनही हा बार्बी सिनेमांची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. या सिनेमाने जगभरात तब्बल ८२७० कोटी रूपयांची कमाई केली आहे.

‘बार्बी’ हा सिनेमा २१ जुलै २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा २०२३ मधला सर्वाधिक कमाई करणारा दुसरा सिनेमा ठरला आहे. या सिनेमाने १७ दिवसांत जगभरात ८२७० कोटींचा टप्पा पार केला आहे. तर एक बिलियनचा टप्पा गाठणारी ग्रेटा गेरविग या पहिला महिला दिग्दर्शिका ठरली आहे.

हेही वाचा – ‘राहुल गांधी यांना बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करायला लावा’; उद्धव ठाकरे यांना भाजप नेत्याचं चॅलेंज?

दरम्यान, ‘बार्बी’ या सिनेमाने प्रेक्षकांना काल्पनिक गुलाबी जगाची सफर दाखवली आहे. सिनेमातील सर्वांनीच चांगलं काम केलं आहे. मार्गोट रॉबी आणि रयान गोसलिंग या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. दिग्दर्शिका ग्रेटासह मार्गोट रॉबी आणि रयान गोसलिंग यांच्याही करियरमधला हा सिनेमा सर्वाधिक कमाई करणारा ठरला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button