breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘जवळच्या माणसानेच घात केला’; बच्चू कडूंचं पंकजा मुंडे यांच्याबद्दल सूचक विधान

मुंबई : भाजप नेत्या पंकडा मुंडे यांनी सोशल मीडियाद्वारे चष्मा लागल्याची माहिती दिली. त्यांनी “ताईला चष्मा लागला, ताईला चष्मा लागला” असं नवं गाणं सादर करत चष्मा लागल्याची माहिती दिली. यासोबतच पूर्वी मला जवळचं नीट दिसत नव्हतं, आता मला चांगलं दिसायला लागेल, असं मिश्किल वक्तव्यही पंकजा मुंडेंनी केलं. यावरून प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

बच्चू कडू म्हणाले, पंकजा मुंडेंचं बरोबर आहे. त्यांचा घात त्यांच्या जवळच्याच माणसाने केला आहे. त्यामुळे त्यांनी चष्मा बदलायला हवा होता. त्यांनी योग्य वेळी त्यांचा चष्मा बदलला आहे. आता त्या चष्म्यातून त्यांनी व्यवस्थित राजकीय लक्ष्य साधावं.

हेही वाचा – Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा गॅन्ट्री बसविण्यासाठी ब्लॉक

पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?

एक मिनिट सरप्राइज.. ताईला चष्मा लागला.. ताईला चष्मा लागला.. लांबचा चष्मा नाही बरं का.. जवळचा चष्मा आहे. मला जवळचं कमी दिसत होतं वाटतं. ते आता चांगलंच स्पष्ट दिसायला लागेल. चष्म्याचा नंबर कमी आहे. पण मला आता जवळचं स्पष्ट दिसेल. दूरचं तर आधीही चांगलं दिसत होतं आणि आताही चांगलं दिसतंय. कसा वाटतोय चष्मा? असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button