breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

सोने, चांदी जैसे थे…जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Rate Today | सध्या लग्नसराईचा काळ अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदी भरारी घेताना दिसत आहे. मात्र असे असताना देखील सध्या सोन्याचे व चांदीचे दर कायम आहेत.

गेल्या तीन दिवसांत सोन्याच्या किंमतीत मोठा बदल झालेला नाही. या आठवड्याच्या सुरुवातीला देखील भावात चढउतार दिसला नाही. अशातच आज २२ कॅरेट सोने ६५,८४० रुपये प्रति १० ग्रॅम तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ७१,८१० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.

हेही वाचा    –      ‘निवडणुकीत संघाच्या बाबतीत चुकीचा प्रचार केला गेला’; सरसंघचालक मोहन भागवत यांचे खडेबोल 

गेल्या आठवड्यात चांदीने ५५०० रुपयांची मुसंडी मारली होती. मात्र या आठवड्याच्या सुरुवातीला चांदीत २०० रुपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे. अशातच आज गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव ९१,७०० रुपये आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button