breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

काश्मीरमध्ये लष्कराची मोहीम फत्ते! हिजबुलचा टॉप कमांडर मेहराजउद्दीन हलवाईचा खात्मा

काश्मीर |

सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत देशातील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असणाऱ्या एका मोठ्या दहशदवाद्याला ठार करण्यात भारतीय सैन्याला यश आले आहे. उत्तर कश्मीरच्या हंदवाडा येथे चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनच्या अतिरेकी संघटनेचा सर्वात जुना आणि सर्वोच्च कमांडर असलेला मेहराजउद्दीन हलवाई उर्फ ​​उबैद याला सुरक्षा दलांनी ठार केले आहे. हा मेहराजउद्दीन अनेक दहशतवादी घटनांमध्ये सामील असल्याची माहिती काश्मीरच्या पोलीस महानिरीक्षकांनी दिली. सुरक्षा दलाचे हे एक मोठे यश असल्याचे असल्याचे त्यांनी म्हटले. उत्तर काश्मीरच्या हंदवारा येथील क्रालगुंडमधील पाझीपोरा-रेनान भागात सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक झाली. या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर हे ऑपरेशन केले गेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उबाईद २०११ मध्ये दहशतवादी गटात सामील झाला होता.

“मारलेला अतिरेकी मेहराजुद्दीन हलवाई उर्फ ​​उबैद २०११ साली दहशतवादी गटात सामील झाला होता. त्याने कॉप्युटर अ‍ॅप्लिकेशनमध्ये डिप्लोमादेखील केला होता. सोशल मीडियाचा दुरुपयोग आणि दहशतवादी कारवायांसाठी वापरल्या जाणाऱ्या संवादाच्या प्रणालीसाठी जबाबदार होता असे” काश्मीर झोन पोलिसांनी ट्वीट केले आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या नोंदींनुसार मेहराजुद्दीन हलवाई हा अ ++ वर्गीकृत दहशतवादी होता. तो दहशतवादी गटात तरुणांची भरती करत होता. चकमकीच्या ठिकाणाहून बेकायदेशीर साहित्य, शस्त्रे आणि दारूगोळे, औषधे जप्त केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हंदवाडा पोलिसांनी ३२ आरआर आणि सीआरपीएफच्या ९२ बटालियनच्या जवानांनी मेहराजुद्दीन लपून बसलेल्या ठिकाणी पोहोचून शोध मोहीम सुरू केली. मेहराजउद्दीन लपून बसलेल्या ठिकाणी पोहोचताच त्याने तिथे ठेवलेला एके-४७ उचलली आणि गोळीबार करत लपून बसला. त्या ठिकाणाला सुरक्षा दलाने घेराव घातला होता. त्याला शरण जाण्यास सांगितले पण त्याने सुरक्षा दलावर अंदाधुंद गोळीबार चालूच ठेवला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button