breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी रजनीश सेठ यांची नियुक्ती

मुंबई : राज्य लोकसवा आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांचा कार्यकाल १९ सप्टेंबर रोजी संपल्यानंतर आयोगावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष होते. दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश राज्य सरकारने नुकतेच दिले आहेत.

हेही वाचा – World Cup 2023 : आयसीसी वर्ल्डकप आजपासून सुरू, जाणून घ्या कधी, कुठे पाहता येणार सामने? 

रजनीश सेठ यांची एमपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने नवीन महासंचालक कोण होणार याचीही चर्चा रंगणार आहे. सध्या केंद्र सरकारच्या सेवेत असलेल्या रश्मी शुक्ला यांना संधी मिळू शकते. रजनीश सेठ १९८८ च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी आहेत. या तुकडीच्या रश्मी शुक्ला या एकच अधिकारी आहेत. जून २०२४ मध्ये त्या निवृत्त होतील. या निमित्ताने राज्य पोलिस दलात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button