breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

World Cup 2023 : आयसीसी वर्ल्डकप आजपासून सुरू, जाणून घ्या कधी, कुठे पाहता येणार सामने?

World Cup 2023 : यंदा वर्ल्ड कपमध्ये एका दिवशी दोन सामने होणार आहेत. त्यामुळे सकाळच्या सामन्यांचा टॉस हा १०.०० वाजता होणार आहे. त्यानंतर दोन्ही देशांचे राष्ट्रगीत होईल आणि त्यानंतर सकाळी १०.३० वाजता सामना सुरु होणार आहे. पण भारताचे या वर्ल्ड कपमध्ये सामने दुपारी होणार आहेत. दुपारच्या सामन्यांचा टॉस हा १.३० मिनिटांनी होईल. त्यानंतर हा सामना अर्ध्या तासाने म्हणजेच दुपारी २.०० वाजता सुरु करण्यात येणार आहे.

या वर्ल्ड कपमधील सामने हे स्टार स्पोर्ट्स वाहिन्यांवर पाहायला मिळणार आहे. स्टार स्पोर्ट्स समुहाकडून इंग्रजी आणि हिंदी अशा दोन भाषांमधून वर्ल्ड कपचे सामने लाइव्ह पाहायला मिळू शकतात. जर तुम्हाला वेब स्टाईट किंवा ॲपवर हा सामना पाहायचा असेल तर त्यासाठी Disney+Hotstar वर तुम्हाला हे सामने पाहता येतील. स्टार स्पोर्ट्स चॅनेलसाठी पैसे मोजावे लागतील.

हेही वाचा – ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा लंडनमध्ये उभारणार’; सुधीर मुनगंटीवार

पण जर हा सामना तुम्ही मोबाईलमध्ये Disney+Hotstar वर पाहिलात तर तो तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला मिळू शकतो. कारण हा सामान जर अन्यत्र कुठे पाहायचा असेल तर त्यासाठी पैसे मोजावे लागतील. पण हा सामना त्यांच्या ॲपवर फ्रीमध्ये दाखवला जाणार आहे. त्यामुळे मोबाईलवर आता तुम्हाला फ्रीमध्ये हा सामना पाहायला मिळू शकतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button