breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

‘या’ दिवशी फक्त ९९ रुपयात पाहता येणार कोणताही सिनेमा

वीरासु, अवतार 2 आणि वेड सिनेमा पहा 99 रूपयात

मुंबई : 20 जानेवारी 2023 रोजी सिनेमा लव्हर्स डे साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे या दिवशी तुम्हाला तुमचा आवडता चित्रपट फक्त 99 रूपयात पाहता येणार आहे. ही ऑफर फक्त 20 जानेवारी या दिवशी असणार आहे. भारतातील काही निवडक शहरांमध्ये सिनेमा लव्हर्स डे साजरा करण्यात येणार आहे.

सिनेमा लव्हर्स डे निमित्त तुम्ही वीरासु, दृश्यम 2, अवतार 2, वेड यांसारखे चित्रपट पाहू शकणार आहे. तिकीट ऑनलाईन बुक करण्यासाठी आईनॉक्ससह इतर कंपन्यांनी खास व्यवस्था केली आहे. तसेच बॉक्स ऑफिस काऊंटरवर देखील तिकिटांची विक्री करण्यात येणार आहे.

गेल्या वर्षी पीवीआर, आईनॉक्स, कार्निवल, सिनेपॉलिस, मिराज, डिलाइट या चित्रपट कंपन्यांनी सिनेमा लव्हर्स डे साजरा होता. त्यावेळी तिकीटाची किंमत 75 रूपये होती. यंदा या किमतीत वाढ करण्यात आली आहे.

मराठी प्रेक्षकांसाठी तब्बल चार चित्रपट चित्रपटगृहात तुमची वाट पाहत आहेत. त्यात वेड, वाळवी, व्हिक्टोरिया आणि सरला एक कोटी हे चित्रपट आहेत. त्यामुळे मराठी प्रेक्षक या संधीचा फायदा घेऊ शकतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button