ताज्या घडामोडीपुणेमुंबई

आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे

अमृता फडणवीस यांची घटनेच्या निषेधार्थ प्रतिक्रिया

मुंबई : कल्याणीनगर अपघात प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पुण्यात येऊन पोलीस आयुक्तलयात बैठक घेऊन कारवाईची माहिती घेतल्यानंतर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी याप्रकरणी ट्विट करून घटनेच्या निषेधार्थ आपली प्रतिक्रिया नोंदविली.

अमृता फडणवीस यांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय?
अपघातातील मृत अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना आहेत. अपघात प्रकरणात दोषी असलेला वेदांत अगरवालला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी करत वेदांतला निबंध लिहायला सांगून जामीन देणाऱ्या बाल न्याय मंडळाचा अमृता फडणवीस यांनी निषेध व्यक्त केला.

वेदांतवर गुन्हा, पण बालहक्क मंडळाकडून जामीन
कल्याणीनगर अपघात प्रकरणात पोलिसांनी आरोपी वेदांतला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला लगोलग जामीन मिळाला. मात्र, आरोपी अल्पवयीन असल्याचीही माहिती समोर आली होती. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलाचे वडील विशाल सुरेंद्र अग्रवाल (वय ५०, रा. ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी, पुणे) विरोधात अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण कायदा २०१५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपीच्या धनाढ्य बापाला बेड्या
पुण्यातील कल्याणीनगरमध्ये बिल्डरपुत्राकडून झालेल्या अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या बिल्डर बापावर गुन्हा दाखल करण्यात आला. अटकेच्या भीतीने पुण्याहून पसार झालेल्या बिल्डर विशाल अग्रवाल याला दोन साथीदारासह शहराच्या दोन विविध ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button