breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीलेख

लोकसंवाद: सर्व पत्ते पुन्हा पिसायला हवेत.!

पाकिस्तान विरुद्ध अविश्वासनीय विजय मिळवून भारतीय संघाने देशवासि्यांना दिवाळीची भेट दिली,पण त्याबरोबरच भारतीय संघाकडून अपेक्षाही वाढल्या.रविवारी भारताची लढत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पर्थ ला होती.वरुणराजाने कृपा केल्याने पुर्ण सामना झाला आणि दक्षिण आफ्रिकेने भारताचा चुरशिच्या सामन्यात पाच विकेटनी पराभव केला आणि भारताचा अश्व जमिनीवर आणला.

पर्थ ची खेळपट्टी हि जगातली सगळ्यात वेगवान आणि चेंडूला उसळी देणारी समजली जाते.त्यात समोर आफ्रिकेचा वेगवान मारा होता ज्यात रबाडा,नगीडी,नॉरके आणि पारनेल सारखे वेगवान गोलंदाज होते,तरीही रोहित शर्मा ने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली.के एल राहुल आणि रोहित शर्मा दोघेही धावांसाठी झगडत असताना बलाढ्य गोलंदाजी विरुद्ध पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय आश्चर्यकारक होता आणि घडलेही तसेच.राहुल सध्या धावांसाठी झगडत आहे आणि पॉवरप्ले मध्ये फक्त दोन क्षेत्ररक्षक बाहेर असताना बेधडक फलंदाजी अपेक्षित असताना तो बचावत्मक सुरवात करतो आणि नंतर विकेट गमावतो.रोहित शर्मा सुद्धा सध्या धावांसाठी झगडतोय आणि अशा सावध सुरवातिमुळे पहिले 10 चेंडू निर्धाव गेले त्यामुळे दडपण वाढले आणि पहिले रोहित आणि मग राहुल स्वस्तात परतले. पाकिस्तान विरुद्ध अविश्वासानीय खेळी करणाऱ्या विराट ने दडपण झुगारत चांगली सुरवात केली पण इन्गिडीच्या आखूड चेंडूवर फाईन लेग ला झेल देऊन तो बाद झाला आणि अक्ख स्टेडियम एकदम शांत झालं. आता सूर्यकुमार यादव ने सूत्र हातात घेतली आणि अचानक आफ्रिकेची गोलंदाजी आणि पर्थ ची खेळपट्टी दोन्ही सामान्य वाटायला लागले. हा सूर्याकुमार यादव खरंच सूर्य देवाचा आशीर्वाद घेऊन आलेला वाटतो. चेंडू टाकण्या आधीच भारताच्या Mr 360 सूर्या ला चेंडू कळतो कि काय अश्या थाटात तो यादवांचा वंशज असल्या प्रमाणे तलवारी सारखी बॅट फिरवतो आणि चेंडू फटकावतो. इन्गिडी नॉरके रबाडा यांना लीलाया खेळत त्याने मात्र चाळीस चेंडूत अडुसाष्ठ धावा फटकावल्या आणि एक वेळ पाच बाद पन्नास अश्या अवस्थेतेतून भारताला एकशे तेहेतीस अशा सन्मानजनक धावसंखेवर पोचवले. आफ्रिकेकडून इन्गिडी ने एकोणतीस धावात चार बळी मिळवले.

भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेची फलंदाजी पण कोलमडली. आशिया कप मध्ये मार खाणारा भुवी ऑस्ट्रेलिया मध्ये कमालीचा यशस्वी ठरत आहे आणि आजही त्याने सुरेख गोलंदाजी केली पण खरी कमाल नवोदित अर्शदीप सिंग ने केली. आशिया कप मध्ये पाकिस्तान विरुद्ध झेल सोडल्याने लोकांच्या रोषाला सामोरे गेलेल्या अर्शदीप ने त्यानंतर घेतलेली भरारी कौतुकास्पद आहे. पाकिस्तान विरुद्ध अप्रतिम गोलंदाजी केल्यावर आजही त्याने पहिल्याच षटकात डिकॉक आणि रुस्सो ला माघारी धाडले. दोन्ही दिशांना चेंडू स्विंग करण्याचे त्याचे कसब वखाणण्या जोगे आहे. त्याने भुवी आणि शमी च्या बरोबर टिचून मारा केला आणि एक वेळ आफ्रिकेला तीन बाद चो्विस असे अडचणीत आणले. पण इथून मार्क्रम आणि मिलर यांनी सुरवातीला सावध खेळून आणि नंतर आक्रमण करून प्रत्येकी अर्ध शतक झळकावून आफ्रिकेला विजयी केले. विराट ने सोडलेला सोप्पा झेल आणि रोहित नी सोडलेला सोप्पा धावचीत याने आफ्रिकेला मदतच केली.

भारताचे पुढील साखळी सामने आता धोकादायक झिम्बाबवे आणि अडखळणाऱ्या बांगला देश बरोबर आहेत. या दोन्ही संघाना गृहीत धरणं भारताला महागात पडू शकतं. राहुल आणि रोहित ची फलंदाजी पुढच्या फलंदाजावर दडपण वाढवतीये. विराट आणि सूर्या प्रत्येक वेळी तुम्हाला जिंकून नाही देऊ शकणार. दीपक हुडा ला संघात फक्त फलंदाज म्हणून घेण्यापेक्षा अक्षर पटेल संघात असावा. अश्विन परदेशात विकेट काढत नाही, खरंतर त्याला विकेट मिळेल असे कधीच वाटत नाही, आजही चार षटकात त्याने आट्ठेचालीस धावा दिल्या त्यामुळे त्याला संघात ठेवायचं कि नाही याचा विचार करावाच लागेल. राहुलच्या जागी आघाडी ला पंत चा विचार होऊ शकतो. एकंदरीत भारताची गोलंदाजी सध्या बहरांत दिसतीये पण फलंदाजानी जबाबदारी ने खेळून त्यांना साथ दिली तरच भारताला अंतिम फेरीच्या आशा बाळगता येतील.!

सुनील शाळगावकर
क्रिकेट प्रशिक्षक

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button