breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

लोकसभेतील विजयानंतर उद्धव ठाकरेंसमोर बंडखोरीचे आव्हान, बंड शमणार की टिकणार?

vidhan parishad maharashtra election : लोकसभा निवडणुकीत शिवसेना उबाठाला दणदणीत यश मिळाले. शिवसेना उबाठाचे नऊ खासदार निवडून आले. यामुळे असली-नसलीचा निकाल जनतेच्या न्यायालयाने दिला आहे. लोकसभेतील विजयाचा जल्लोष उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत साजरा होत असताना बंडखोरीचे आव्हान आले आहे. नाशिक शिक्षक मतदार संघातील ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील बंडखोरी करण्याच्या तयारीत आहे. त्यांना शिक्षक मतदार संघात उमेदवारी न दिल्यामुळे त्या नाराज आहेत. त्याची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना “मातोश्री”वर बोलवण्यात आले आहे.

शुभांगी पाटील नाशिक शिक्षक मतदार संघात बंड करणार असल्याची चर्चा सुरु आहे. कारण ठाकरे गटाने नाशिक शिक्षक मतदार संघात संदीप गुळवे यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे शुभांगी पाटील पक्षात नाराज आहेत. शुभांगी पाटील यांनी गेल्या वर्षी झालेल्या पदवीधर निवडणुकीत देखील आपले नशीब आजमवले होते. परंतु त्यावेळी भाजपने पाठिंबा दिला नाही. त्यावेळी भाजप सत्यजित तांबे यांच्यामागे उभी राहिली. यामुळे तांबे यांचा विजय झाला होता.

हेही वाचा – घडामोडींना वेग… काँग्रेसही सत्ता स्थापनेचा दावा करणार, फॉर्म्युला तयार; नाना पटोले यांचा दावा काय?

नाशिक पदवीधर मतदार संघातून शुभांगी पाटील यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी शिक्षक मतदारसंघाची तयारी सुरू केली होती. मात्र, ऐनवेळी ठाकरे गटाने संदीप गुळवे यांना काँग्रेसमधून आपल्या पक्षात प्रवेश दिला. तसेच त्यांना थेट शिक्षक मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली, त्यामुळे शुभांगी पाटील या नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांची नाराजी उद्धव ठाकरे दूर करणार की त्या बंडखोरी करणार? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघ निवडणुकीत भाजपचे नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत. राजेंद्र विखे पाटील यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे नाशिक शिक्षक मतदार संघात चुरस वाढली आहे. याआधी कोपरगावचे भाजप नेते आणि देवेंद्र फडणवीस यांचा निकटवर्तीय समजले जाणारे विवेक कोल्हे यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button