breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मोशी येथील २५० मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

पिंपरी | मोशी पिंपरी-चिंचवड येथील २५० मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून इच्छुकांकडून प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

वसतिगृहात इयत्ता ११ वी व पुढील शिक्षण घेवू इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, खुला प्रवर्ग, अपंग, अनाथ प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासनाने निर्धारित केलेल्या टक्केवारीच्या अधिन राहून रिक्त जागांवर प्रवेश देण्यात येणार आहेत.

हेही वाचा     –      ‘सत्ता आहे म्हणून निवडणूक आयोगाचा वापर…’, बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?

वसतिगृहात १५० विद्यार्थ्यांची क्षमता असून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना विनामूल्य निवास, अंथरूण, पांघरुण, भोजन, पुस्तके, स्टेशनरी, शैक्षणिक बाबींकरीता आर्थिक सहाय्य, दरमहा ८०० रूपये निर्वाह भत्ता, ग्रंथालय आदी सुविधा पुरविण्यात येणार आहे.

सन २०२४-२५ या वर्षात वसतिगृहाच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया सूरू असून दहावी, बारावी व इतर अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून प्रवेश अर्ज वाटप वसतिगृहाच्या कार्यालयामध्ये सुरू होत आहे.

विद्यार्थ्यांनी आपल्या अंतिम परीक्षेचा निकाल घेवून अर्ज नेण्यासाठी व अधिक माहितीसाठी २५० मुलांचे शासकीय वसतिगृह, मोशी पिंपरी-चिंचवड येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन वसतिगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button