ताज्या घडामोडीमनोरंजनविदर्भ

अभिनेत्री, लेखिका मधुरा वेलणकरला यंदाचा ‘मनोरमा साहित्य सेवा पुरस्कार’

लेखिका म्हणून मधुराचा पहिलाच पुरस्कार, सोलापुरात सन्मान

सोलापूर : मराठी मालिका आणि सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे मधुरा वेलणकर… मधुरा तिच्या कसदार अभिनयासाठी ओळखली जाते. पण अभिनयाशिवाय काही वेगवेगळ्या गोष्टी करताना दिसते. मधुरा जितका कसदार अभिनय करते तितकंच तिचं लिखाणही चांगलं आहे. मधुरा वेलणकर हिने ‘मधुरव’ हे पुस्तकही लिहिलं आहे. .या तिच्या पुस्तकाला पुरस्कार प्राप्त झाला आहे. अभिनेत्री, लेखिका मधुरा वेलणकर साटमला यंदाचा ‘मनोरमा साहित्य सेवा पुरस्कार’, सोलापूर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. लेखिका म्हणून मधुरा वेलणकर साटमचा हा पहिलाच पुरस्कार आहे. ‘मधुरव’ पुस्तकाच्या निमित्ताने अभिनेत्री, लेखिका मधुरा वेलणकर साटमला पुरस्कार प्राप्त झाला आहे.

लेखिका म्हणून पहिलाच पुरस्कार
चार राज्य पुरस्कारांची आणि इतर अनेक पुरस्कारांची मानकरी ठरलेली एक चतुरस्र अभिनेत्री म्हणून आपल्याला परिचित असलेली अभिनेत्री म्हणजे मधुरा वेलणकर… नाट्य-चित्रपट-अभिनय शिबिरं-कार्यशाळा अशा नानाविध माध्यमांतून गेल्या दोन दशकांहून अधिक काळ ती कलाक्षेत्रात आहे. अभिनयाच्या क्षेत्रात घोडदौड करणाऱ्या 30 हून अधिक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची मोहोर उमटवणाऱ्या अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम हिने अगदी सहजच लेखन क्षेत्रातही पाऊल टाकलं. तिचे पहिलवहिले लेखिका म्हणून असलेले ‘मधुरव’ पुस्तकही अल्पावधीतच लोकप्रिय ठरलंय.

सोलापुरात मधुराचा सन्मान
‘मधुरव’ या रसिक आंतरभारती प्रकाशित पुस्तकासाठी यंदाचा ‘मनोरमा साहित्य सेवा पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. सोलापूरमध्ये सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या हस्ते नुकताच अभिनेत्री, लेखिका मधुरा वेलणकर साटमला प्रदान करण्यात आला. राज्यस्तरीय पुरस्कार-मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक, आणि रोख एकवीस हजार रुपये असं पुरस्काराचं स्वरूप होतं.

उमेद पुरस्कार कला गौरव पुरस्कार, कर्तृत्त्व आभा पुरस्कार, राणी सईबाई पुरस्कार, रोटरी लाईन्स, क्लब यंग गेस्ट अचीवर अवॉर्ड, व्ही.शांताराम पुरस्कार अशा अभिनयासाठी मिळालेल्या अनेक विविध पुरस्कारांनांतर लेखनाकरिता मिळालेल्या ह्या पुरस्काराचे मोल हे नक्कीच विशेष आणि नवीन ऊर्जा देणारे असल्याचे अभिनेत्री, लेखिका मधुरा वेलणकर साटम हिने सांगितले. तसेच सध्या माया या नवीन कादंबरीचे लेखन सुरु असल्याचे ही तिने आवर्जून नमूद केलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button