breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

रामलल्लाच्या मूर्तीचा आज मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश! जलाधिवास-गंगाधीवास देखील होणार

Ram Mandir Ayodhya | अयोध्येत रामलल्ला मंदिरात विराजमान करण्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. २२ जानेवारीला रामनगरीच्या नव्याने बांधलेल्या मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीला अभिषेक केला जाणार आहे. अशातच आज १८ जानेवारी २०२४ ला राम मंदिर विधींचा तिसरा दिवस आहे. आज गर्भगृहात रामलल्ला प्रवेश करणार आहे.

यासोबतच आज राममंदिरात जलाधिवास-गंगाधीवास होणार आहे. आज रामललाचा जलाधिवास असेल. जलाधिवास म्हणजे ज्या मूर्तीला अभिषेक करावयाचा आहे ती मूर्ती शास्त्रीय पद्धतीनुसार ठराविक वेळेपर्यंत पाण्यात ठेवली जाणार आहे. यानंतर सायंकाळच्या सुमारास गंगाधीवास होईल. यामध्ये श्रीरामाच्या मूर्तीवर सुवासिक द्रव्ये लावली जाणार आहेत.

हेही वाचा    –    प्रकाश आंबेडकर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार का? आमंत्रण मिळाल्यानंतर म्हणाले, भाजपा आणि आरएसएसने..

१९ जानेवारी २०२४ रोजी अयोध्या राम मंदिरात औषधी, केसराधिवास, घृताधिवास आणि धनाधिवास होणार आहेत. यामध्ये रामललाच्या मूर्तीवर औषधी, केशर, तूप आणि धान्य ठेवण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button