ताज्या घडामोडीमुंबईराजकारण

अभिजीत बिचुकलेंची कल्याण मतदारसंघात एन्ट्री

बिचुकलेंना किती मतं

मुंबई: स्थानिक निवडणुका असो किंवा लोकसभा निवडणूक…एक नाव नेहमीच चर्चेत असतं ते म्हणजे अभिजीत बिचुकले. साताऱ्याच्या या अभिजीत बिचुकलेंनी हटके अंदाजानं एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.

लोकसभा निवडणुकांची मतमोजणी शेवटच्या टप्प्यात आली आहे. ठाणे-पालघर जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, भिवंडी आणि पालघर जिल्ह्यांतील उमेदवारांचे भवितव्य स्पष्ट होत आहे. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे या विद्यमान खासदारांची प्रतिष्ठाही पणाला लागली होती. पण आता या मतदार संघाचे निकाल समोर आले आहेत. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे गटाच्या गटाच्या वैशाली दरेकर या उभ्या होत्या. पण याच मतदार संघातल्या आणखी एका उमेदवारानं लक्ष वेधून घेतलं आहे, ते म्हणजे अभिजीत बिचुकले. बिचुकले यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.

बिचुकलेंना किती मतं?
पराभवाची खात्री असताना बिचुकले निवडणूक लढवताना दिसतात. आतापर्यंत आलेल्या मतमोजणीनुसार बिचुकलेंना ९०० च्या जवळपास मतं मिळाली आहेत. कल्याणमध्ये आपला विजय नक्की होणार, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला होता. तर बिचुकलेंनी साताऱ्यातूनही निवडणुकीचा अर्ज भरला होता. या मतदार संघात त्यांना ४५८ मतं मिळाली आहेत.

कोण आहेत अभिजीत बिचुकले?
बिचुकलेंबद्दल बोलायचं झालं तर त्यांना अभिनय करण्याची आवड होती. पण त्या क्षेत्रात त्यांना संधी मिळाली नाही. साताऱ्यातलं बिचुकले हे त्यांचं गाव. अभिजित जयसिंगराव आवाडे बिचुकले असं त्यांचं पूर्ण नाव आहे.

अभिजीत बिचुकले हे बिग बॉसमध्ये सहभागी झाले होते. या शोमधून ते घराघरांत पोहोचले. शोच्या पहिल्या दिवसापासूनच आपल्या स्वभावामुळं ते चर्चेत होते. अभिजीत बिचुकले बिग बॉस मराठी सीझन २ मध्ये देखील दिसले. मात्र काही वादांमुळं त्यांना शोमधून बाहेर पडावे लागलं होतं.

डिपॉझिट जप्त
बिचुकलेंनी यापूर्वी अनेकदा निवडणुका लढवल्या आहेत. पण एकदाही त्यांचा विजय झाला नाहीये. प्रत्येकवेळी त्यांचं डिपॉझिट जप्त झालं आहे. इतकंच नाही तर बिचुकलेंनी थेट सातारच्या उदयनराजे भोसले यांना आव्हान दिलं होतं. तर राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती.
मुख्यमंत्री मीच ठरवणार२०१९मध्ये ‘महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मीच ठरवणार’ असं बेधडक वक्तव्य त्यांनी केलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button