breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

राज्यभरातील तब्बल १४ लाख ९० हजार ५४५ विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अवैध!

मुंबई : आपल्या देशात आधारकार्ड हा स्वत:ची ओळख दाखविण्यासाठी महत्वाचा दस्तावेज मानला जातो. सरकारी असो वा खासगी..कोणत्याही कंपनीत आधार कार्ड हे मुख्य डॉक्युमेंट्स मानले जाते. पण या आधारकार्ड संदर्भात धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील तब्बल १४ लाख ९० हजार ५४५ विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अवैध असल्याची माहिती समोर आली आहे.

आधारकार्डमुळे नागरिकांची ओळख पटते. त्यावर नागरिकांची सर्व महत्वाची माहिती असते. त्यामुळे या दस्तावेजाला विशेष महत्व असते. पण असे असताना राज्यातील २ कोटी ११ लाख ४४ हजार ४६७ विद्यार्थ्यांपैकी १ कोटी ९३ लाख ४५ हजार १११ आधारकार्ड वैध ठरले आहेत. तर ३ लाख ८ हजार ८११ विद्यार्थ्यांकडे अद्याप आधारकार्ड नसल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा – राष्ट्रीय ललित कला अकादमीसाठी मुख्यमंत्र्यांना ‘साकडे’

राज्य सरकारने लेखी उत्तरात विधान परिषदेत ही माहिती दिली. आधार कार्ड अवैध ठरले असले तरी विद्यार्थांना योजनांपासुन वंचित ठेवण्यात येणार नाही. या विद्यार्थांना आधारकार्ड मिळवून देण्यासाठी यंत्रणा देखील उपलब्ध करून दिल्या आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button