TOP Newsताज्या घडामोडीविदर्भ

वैदर्भीय बेरोजगारांची फरफट; ४१३२ बेरोजगारांची नोंदणी, मात्र, नोकरी ३४७ जणांना

नागपूर | ऑक्टोबर महिन्यात राज्य सरकारच्या रोजगार व उद्योजकता विभागाच्या ‘महास्वयंम’ पोर्टलवर रोजगारासाठी नोंदणी करणाऱ्या विदर्भातील ४१३२ बेरोजगारांपैकी फक्त ३४७ उमेदवारांना नोकरी मिळाली. यात पूर्व विदर्भातील फक्त ३१ जणांचा समावेश आहे.

ऑक्टोबर २०२२ मध्ये विभागाकडे ४५ हजार ६०६ उमेदवारांनी नोंदणी केली. त्यात विदर्भातून नागपूर विभागातून २ हजार ४१० तर अमरावती विभागातून १ हजार ७२२ अशा एकूण ४१३२ उमेदवारांचा समावेश होता. यापैकी नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातून ३१ तर अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातून ३१६ असे एकूण ४४७ जणांना नोकरीची संधी मिळाली. राज्याच्या इतर भागाचा विचार करता पुणे विभाग आघाडीवर आहे. या विभागात १२ हजार ६२२ तरुणांना नोकरी मिळाली. त्यानंतर मुंबई (७ हजार ४९५,) औरंगाबाद विभागाचा (७ हजार ४९५) क्रमांक लागतो. ज्या भागात उद्योग अधिक आहेत त्या भागात रोजगाराच्या संधी अधिक असल्याचे ही आकडेवारी स्पष्ट करते.

रोजगाराच्या प्रश्नाने देशात विक्राळ रूप धारण केले आहे. अलीकडेच महाराष्ट्रात येणारे अनेक मोठे उद्योग इतर राज्यात गेल्याने हा प्रश्न अधिक ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर वरील आकडेवारी चिंता निर्माण करणारी आहे.

विभाग – नोंदणी – नोकरी

पुणे – २३९२६ – १२,६२२

मुंबई – ७,४९५ – ४,४५५

औरंगाबाद – ५,८७८ – २ ७३९

नाशिक – ४,१७५ – १३६२

अमरावती – १,७२२ – ३१६

नागपूर – २४१० – ३१

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button