breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

पुणे मेट्रो स्थानकातील थरार! सिक्युरिटी गार्डने तत्परता दाखविली, ३ वर्षाच्या चिमुकल्याचे वाचले प्राण

पुणे | पुणे मेट्रोच्या शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकात खेळताना एक चिमुकला प्लॅटफॉर्मवरून रूळावर पडला. त्याला वाचवताना त्याची आई देखील रूळावर पडली. ही गोष्ट कामावर असलेल्या सुरक्षारक्षकाच्या लक्षात आली. त्यावेळी प्रसंगावधान राखत सुरक्षा रक्षक विकास बांगर याने त्यांचे प्राण वाचवले.

जिल्हा न्यायालयात शुक्रवारी ही घटना घडली. एक महिला तीन वर्षांच्या मुलासोबत मेट्रोने प्रवास करीत होती. ती मेट्रोची वाट पाहात फलाटावर थांबली होती. त्यावेळी मुलगा फलाटावर धावत असताना अचानक मेट्रोच्या ट्रॅकवर पडला. हे पाहून त्याची आई मुलाला ट्रॅकवरून वर खेचण्यासाठी पुढे सरसावली. ती मुलाला वर खेचत असताना तोल जाऊन ती ट्रॅकवर पडली. इतर प्रवाशांनी धाव घेत त्या दोघांना खेचण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याचवेळी दोन्ही ट्रॅकवरून दोन गाड्या वेगाने येत होत्या.

हेही वाचा    –    ‘मी असेन नसेल…’; मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील भावुक

गाडी येत असल्याचे पाहून मेट्रोचे सुरक्षारक्षक विकास बांगर यांनी प्रसंगावधान राखत फलाटावरील आपत्कालीन स्थितीत मेट्रो थांबविण्याच्या बटणाकडे धाव घेतली. त्यांनी वेळीच बटण दाबल्याने ट्रॅकवर पडलेल्या मायलेकांपासून सुमारे ३० मीटर अंतरावर गाड्या येऊन थांबल्या. त्या कालावधीत प्रवाशांनी यशस्वीपणे या मायलेकांना ट्रॅकवरून फलाटावर खेचून घेतले. त्यामुळे दोघांचे प्राण वाचू शकले.

मेट्रोकडून बांगर यांचा सत्कार मेट्रोचे सुरक्षारक्षक विकास बांगर यांनी प्रसंगावधान राखत दोन जणांचे प्राण वाचविल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. महामेट्रोने बांगर यांचा सत्कार केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button