breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
Viral Video : वटपौर्णिमेनिमित्ताने पूजा करताना अचानक झाडाला लागली आग

कोल्हापूर : वटपौर्णिमेच्या दिवशी महिला जन्मोजन्मी हाच पती मिळावा, अशी प्रार्थना करतात. मात्र कोल्हापूरातील अंबाबाई मंदीर परिसरात वडाच्या झाडाची महिला पूजा करत असताना अचानक झाडाला आग लागली. त्यामुळे महिलांची तारांबळ उडाली.
हेही वाचा – ‘पुणे तिथे काय उणे!’ एकाच दिवशी ५१ जणांचा वाढदिवस साजरा
कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर परिसरात ही घटना घडली आहे. एका महिलेने झाडावर पेटता कापुर टाकल्यामुळे वडाच्या झाडाने पेट घेतल्याची घटना घडली. आग लागल्याची माहिती मिळताच मंदिर परिसरातील यंत्रणेनी आग विझविण्यासाठीचे प्रयत्न केले. तसेच अग्निरोधक मशीनच्या मदतीने ही आग विझवण्यात आली. तसेच महिलांनी पूजा करताना काळजी घेण्याचे आवाहन मंदिर समितीकडून करण्यात आले आहे.