Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरीत गॅस गळती होऊन भीषण आग

भोसरी – भोसरी एमआयडीसीतील अनंत इंटरप्राईजेस टी ब्लॉक कंपनीतील गॅस सप्लाय स्टेशनमध्ये गॅस गळती होऊन भीषण आग लागली. ही आग आज (शनिवार) सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी लागली. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही.

या घटनेनंतर संत तुकाराम नगर येथील अग्निशामक केंद्राचे दोन बंब आणि भोसरी उपकेंद्राचा एक बंब घटनास्थळी तातडीने रवाना होऊन पंधरा ते वीस मिनिटे कूलिंग करण्याची काम चालू केले. त्यानंतर एम एन जी एल कंपनीला घटनेबाबत माहिती दिल्यानंतर इनलेट गॅस बंद केल्याने ही आग आटोक्यात आली.

घटनास्थळी उप अग्निशामक अधिकारी अशोक कानडे, शांताराम काटे, फायरमन संजय ठाकूर, कैलास वाघिरे, सरोष फुंडे, अमोल चिपळूणकर, कृष्णा कदम, कैलास डोंगरे, पुंडलिक भुतापले, संभाजी दराडे, नितीन गोगोले, वाहन चालक विशाल बाणेकर, देवा जाधव आदी कर्मचारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button