Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहीद हेमू कलानी यांचा देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठा त्याग – पालकमंत्री गिरीष बापट

पिंपरी-  तरुणांनी हेमू कलानी यांचे चरित्र आपण वाचले पाहिजे, शहीद हेमू कलानी यांचा देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठा त्याग असून त्यांच्या या ठिकाणी होत असलेल्या पुतळ्यामुळे सर्वांना स्फूर्ती मिळेल” असे मत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.

महापालिकेच्या वतीने आज (गुरुवारी) पिंपरीत शहीद हेमू कलानी अर्धपुतळ्याच्या चौथा-याचे भुमिपूजन व उद्यान सुशोभिकरण कामाचा शुभारंभ हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी महापौर नितीन काळजे, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, शहर सुधारणा समिती सभापती सीमा चौगुले, ग प्रभाग अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन, नगरसेवक संदीप वाघेरे, डब्बु आसवानी, निकीता कदम, उषा वाघेरे, स्वीकृत सदस्य मोरेश्वर शेडगे, माजी नगरसेविका ज्योतिका मलकानी, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता संजय कांबळे, उद्यान अधीक्षक दत्तात्रय गायकवाड, अमोल थोरात, सिंधु सेवा संगम संस्थेचे कमल मलकानी, श्रीचंद संगदील, शिव इदनानी, अशोक पुनजाबी, हिरो आहुजा, मधु सबनानी, जवाहर कोटवानी, संतोष कुदळे आदी उपस्थित होते.

खासदार साबळे म्हणाले, “अखंड भारत निर्माण करण्यासाठीचे शहीद हेमू कलानी यांचे स्वप्न साकार होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. स्वतंत्र भारताच्या निर्माणामधील शहीद हेमू कलानी हे एक अदभूत स्वातंत्र्य सेनानी होते”  संदीप वाघेरे प्रास्ताविक केले. रमेश भोसले सूत्रसंचालन यांनी केले. तर दादा पमनाणी यांनी आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button