Breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

भाजप-शिवसेनेचे विधानसभेला फिक्टी-फिक्टी फाॅर्मुला – रावसाहेब दानवे

  • भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची माहिती

पिंपरी ( महा ई न्यूज ) – आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती कायम राहणार आहे. तसेच दोन्ही पक्षाने विधानसभेला फिक्टी-फिक्टी जागा वाटप केले जाणार आहे. दोन्ही पक्षाच्या कोट्यातून मित्रपक्षाना देखील सोबत घेवून विधानसभा निवडणुक लढविणार आहे. असे सुतवाच भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले.

पिंपरी चिंचवड शहर भाजप कार्यालयाचे उद्घाटन रावसाहेब दानवे यांचे हस्ते करण्यात आले. केंद्रीयमंत्री पदी दानवे यांची निवड झाल्याने भाजप पदाधिका-यांच्या वतीने त्यांचा सत्कार आयोजित केला होता. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी खासदार गिरीष बापट, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार योगेश टिळेकर, आमदार महेश लांडगे उपस्थित होते. शहर भाजप

दानवे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेला तब्बल 41 जागा मिळाल्या आहेत. लोकसभेच्या प्रचंड यशानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत देखील दोन्ही पक्षाची युती कायम राहणार आहे. आम्ही मित्र पक्षाना सोबत घेतल्याने त्यांना विधानसभेला जागा सोडाव्या लागणार आहेत. जागा वाटपाची बोलणी होवून त्या फाॅर्मुलावर लवकरच शिक्कामोर्तब होईल. त्यामुळे विधानसभा निवडणुकीला राज्यात निश्चित भगवा झेंडा फडकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button