रमजान ईद : मुस्लिम बांधवांनी एकमेकांना दिल्या भरभरून शुभेच्छा
पिंपरी, (महाईन्यूज) – मुस्मिल धर्मियांचा पवित्र रमजान ईद आज पिंपरी-चिंचवडमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. शहराच्या विविध भागातील वेगवेगळ्या मस्जिदींमध्ये मुस्लिम बांधवांनी आज सकाळी नमाज पठण केले. ईद मुबारक म्हणत गळाभेट घेत मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वत्र ईदचा माहोल तयार झाला आहे. आज बुधवारी (दि. 5) सकाळी चिंचवड, नेहरूनगर, पिंपरी, काळेवाडी, जाधववाडी आदी भागातील मस्जिदींमध्ये मुस्लिम बांधवांनी नमाज पठणासाठी गर्दी केली होती. नमाज पठण झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी सर्वधर्मियांना ईदच्या मनोभावे शुभेच्छा दिल्या. यावेळी मुस्लिम बांधवांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.
लहान मुलांसह तरुण, ज्येष्ठ नागरिकांनी नवनवीन कपडे घातले होते. यंदा दुष्काळ पडला असल्यामुळे मराठवाडा, विदर्भ या भागातील शेतक-यांना सुगिचे दिवस यावेत, त्यासाठी यंदा मोठा पाऊस पडावा, यासाठी अल्लाकडे त्यांनी दुवा केली. रमजानचा उपवास आज सुटल्याने सर्वांच्या चेह-यावर आनंदी वातावरण संचारले होते.