घरासमोर लघुशंका केली म्हणून कानाखाली लगावणाऱ्याची दगडानं ठेचून हत्या
![Kidnapping of a goldsmith claiming to be an "income tax" officer](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/Crime.jpg)
दिल्लीमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोविंदपुरीतील नेहरू कॅम्पमध्ये घरासमोर लघुशंका केली म्हणून कानाखाली लगावणाऱ्याची दगडानं ठेचून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सोमवारी सायंकाळी दिल्लीमधील लीलू नावाच्या तरूणाची जमावानं दगडानं ठेचून हत्या केली.
प्रचंड उकाड्यामुळे नेहरू कॅम्पमधील लिलूचं कुटुंब घराबाहेर रस्त्यावर बसले होते. त्यावेळी कुटुंबासमोरच एक व्यक्ती लघूशंका करत होता. त्यावेळी त्याला कुटुंबियातील लोकांनी समजावण्याचा प्रयत्न केला. लीलूनं तो ऐकत नसल्याचे पाहून त्याच्या कानाखाली आवाज काढला. त्यावेळी तरूणाच्या जमावानी मिळून २८ वर्षीय लिलूची दगडानं ठेचून हत्या केली. मृत लीलूवर तब्बल १७ गुन्हे दाखल आहेत.
नेहरू कॅम्पमध्ये लाईट गेल्यानंतर लीलू आणि त्याची पत्नी घराबाहेर बसले होते. त्यावेळी एक व्यक्ती समोर उभा राहून लघुशंका करू लागला. त्यावेळी लीलूनं तसे करू नको म्हणून सांगत होता. त्यावेळी लीलूनं त्याच्या कानाखाली लगावली. त्यानंतर त्या तरूणाचे दोन मित्र आणि कुटुंबियांनी लीलूसोबत मारहाण केली. त्याचवेळी एका व्यक्तीनं लीलूच्या डोक्यावर आणि पोटावर मोठा दगड मारला. मारहाणीमुळे लीलू बेशुद्ध झाला. उपचारासाठी लीलूला एम्स ट्रामा रूग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी लीलूला मृत घोषीत केलं.
या प्रकरणाबाबत पोलिसांनी काही जणांना अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.