Breaking-newsपिंपरी / चिंचवड
प्रियकराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/crime-1-1.jpg)
पिंपरी – लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरूणीने प्रियकराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. ही घटना पिंपरी येथे 24 एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी तरूणीच्या आईने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार किरणकुमार सेवक विरवाणी (वय-38, रा. पिंपरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांची 19 वर्षीय मुलगी आरोपी किरण कुमारबरोबर 2016 पासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. आरोपीने तरूणीला शिवीगाळ करून मारहाण केली. तिचा मानसिक छळ करत तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. यावरुन आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.