सात महिन्याच्या गरोदर विवाहितेने तिस-या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/suicide-jump_201810150270.jpeg)
पुणे – सासु-सासरे आणि नवरा यांच्या सततच्या शारिरीक व मानसिक त्रासाला कंटाळुन सात महिन्याच्या गरोदर विवाहितेने तिस-या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. वैष्णवी सिटी हांडेवाडे रस्ता देवाची उरुळी येथे ही घटना घडली.
याप्रकरणी एका महिलेने फिर्याद दिली असून नव-यासह इतर दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओंकार सिध्दप्पा जट्टेपळगोट (वय 24 रा. कात्रज संतोषीनगर लेन क्रमांक 5) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी अश्विनी ओंकार जट्टेपगोळ (वय 19, रा. कात्रज, संतोषीनगर लेन क्रमांक 5) हिचा ओंकार याच्याशी विवाह झाला. ओंकार हा एका खासगी कंपनीत नोकरीस आहे. लग्न झाल्यानंतर सासरी नांदत असताना पतीसह सासु आणि सासरे यांनी संगनमत करुन तिचा शाररीक व मानसिक छळ सुरु केला. अश्विनी सात महिन्यांची गरोदर असताना देखील सासरच्या मंडळींकडून तिला त्रास सहन करावा लागत होता. शेवटी तिला हा शाररीक व मानसिक त्रास सहन न झाल्याने तिने माहेरी तिस-या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एम एच तडवी पुढील तपास करीत आहेत.