पिंपरी-चिंचवडमधील मतदारांचा कौल पाहता आघाडीचा विजय निश्चित – पार्थ पवार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/56960677_1557216867745063_6901709842751160320_o.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – मावळ मतदार संघात विकासाची गंगा आणायची असेल तर लोकांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. जास्तीतजास्त लोकांनी मतदान करून लोकशाहीने दिलेले कर्तव्य बजावले पाहिजे. सकाळपासून मतदारांनी दिलेला प्रतिसाद पाहता आघाडीचा विजय समोर दिसत असल्याचा विश्वास उमेदवार पार्थ पवार यांनी व्यक्त केला.
मावळ लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीचा कौल पाहण्यासाठी उमेदवार पार्थ पवार आज सकाळी पिंपरी-चिंचवडमध्ये आले होते. त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही भावना व्यक्त केली.
पार्थ पवार म्हणाले की, मावळातील बेरोजगारी, अपुरा पाणी पुरवठा, व्यावसायिक-शेतकरी-कामागारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आता बदल हवा आहे. आज सकाळपासून मतदारांनी घराबाहेर पडून जो मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यातून लोकांची भावना व्यक्त होताना दिसते. निश्चितच त्यांना परिवर्तन हवे आहे. मतदारांनी दिलेला कौल पाहता राष्ट्रवादीचा विजय होणार, अशी भावना पवार यांनी व्यक्त केली. सायंकाळी सहापर्यंत जास्तीतजास्त संख्येने मतदारांनी घराबाहेर पडून लोकशाहिने दिलेला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.