महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांची प्रचारात आघाडी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/IMG-20190421-WA0007.jpg)
- मतदारांच्या गाठी-भेटी घेण्यावर दिला भर
- पनवेल, कर्जत आणि उरण परिसरात जोरदार मोर्चेबांधणी
पनवेल – मावळ लोकसभा मतदारसंघाचे काॅंग्रेस-राष्ट्रवादी काॅंग्रेस, शेकाप मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी मतदारांच्या गाठीभेटी देण्यावर भर दिला आहे. पार्थ पवार यांनी पनवेल, कर्जत आणि उरण परिसरातील गावा-गावात जावून तेथील लोकांशी भेटून संवाद साधला जात आहे. मतदारांशी थेट चर्चा करुन त्याच्या अडीअडचणी जाणून घेत आहेत. त्यामुळे महाआघाडीने प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी पनवेलमधील मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला आहे. शनिवारी सकाळी खारघरमधील कोपरे गावापासून त्यांनी दौऱ्याला सुरुवात केली. त्यानंतर सेक्टर १०, सेक्टर ८, सेक्टर २, सेक्टर ७, सेक्टर ११ मधील सर्व सोसायटींमधील रहिवाशांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मतदारांबरोबरच कार्यकर्त्यांशीही ते वैयक्तिकरीत्या भेट घेत आहेत. या वेळी त्यांच्यासोबत सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, नगरसेवक हरीश केणी, पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सतीश पाटील आदी उपस्थित होते.