ऊस पेटवून दिल्याने बिबट्याच्या पाच बछड्यांचा होरपळून मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/leopard-cubs.jpg)
पुणे :- पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथील गुणगे शेटे मळ्यात आज सकाळी बिबट्याची पाच पिल्ले मृत अवस्थेत आढळली आहेत. ऊसतोड कामगारांना तोडणी सुरु असताना ही पिले सापडली.
सुत्रांच्या माहितीनुसार, बुधवारी अवसरी बुद्रुक येथील गोपीनाथ सखाराम गुणगे यांच्या शेतात ऊस तोडणी सुरू होती. दरम्यान, घोणस दिसल्याने तितक्या भागावरील शेतातला ऊस पेटवून देण्यात आला होता. तेवढ्यात ऊसाच्या शेतातून बिबट्याची मादी बाहेर पळून गेली आणि दोन तासांनी पाच पिल्ले मृत अवस्थेत ऊसतोड कामगारांना सापडली.
दोन तासांनी कामगारांनी ऊस तोडण्यास सुरूवात केली आणि याच वेळेत ऊसात पाच मृत बिबट्याची पिल्ले आढळली आहेत. घटनास्थळी वनविभाचे अधिकारी दाखल झाले असून या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेमुळे बिबट्याची मादी अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे, अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.