भारतीय अभियंत्यांची त्वरीत सुटका करा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/united-nation-tag.jpg)
- संयुक्तराष्ट्राची अफगाणिस्तानला सुचना
संयुक्तराष्ट्रे – अफगाणिस्तानात अपहरण करण्यात आलेल्या सात भारतीय अभियंत्यांची त्वरीत आणि सुखरूप सुटका करण्यासाठी अफगाणिस्तान सरकारने कसोशीचे प्रयत्न करावेत अशी सुचना संयुक्तराष्ट्रांनी केली आहे. गेल्या रविवारी या अभियंत्यांचे अपहरण करण्यात आले आहे. त्यावर प्रतिक्रीया देताना संयुक्तराष्ट्रांच्या सरचिटणीसांचे प्रवक्ते स्टीफन दुजारीक यांनी म्हटले आहे की या अभियंत्यांची त्वरीत सुटका होणे गरजेचे आहे.
या घटनेची संयुक्तराष्ट्रांकडे काही अधिकृत माहिती आली आहे काय असे पत्रकारांनी त्यांना विचारले असता त्यांनी या विषयीची कोणतीही माहिती आमच्याकडे अद्याप अधिकृतपणे कळवण्यात आलेली नाहीं असे स्पष्ट केले. दरम्यान कालच अफगाणिस्तानचे विदेश मंत्री सल्लाउदीन रब्बानी यांनी भारताचे त्या देशातील राजदूत विनयकुमार यांची भेट घेऊन आम्ही सुटकेसाठी सर्व शक्य ते प्रयत्न करीत आहोत असे त्यांनी सांगितले आहे.