प्रथम राज्यांच्या निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करा- राहुल गांधी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/rahul-gandhi1.jpg)
- भाजपचा राहुल गांधींना शाब्दिक टोला
नवी दिल्ली – भाजपने आज पंतप्रधानपद स्वीकारण्याची तयारी दर्शवणारे वक्तव्य केल्याबद्दल कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची खिल्ली उडवली. मोठे स्वप्न पाहणाऱ्या राहुल यांनी प्रथम राज्यांच्या निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करावा, असा शाब्दिक टोला भाजपकडून लगावण्यात आला.
पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणे हा राहुल यांचा अधिकार आहे. मात्र, कॉंग्रेसचे मित्रपक्षही त्यांना नेता म्हणून स्वीकारणार नाहीत. राहुल कॉंग्रेसचे उपाध्यक्ष बनल्यानंतर त्या पक्षाचा 13 राज्यांमध्ये पराभव झाला. ते अध्यक्ष बनल्यावर कॉंग्रेसला पाच राज्यांत पराभव पत्करावा लागला. आता कर्नाटक सहावे राज्य बनेल, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी दिली. पंतप्रधान बनण्याविषयी राहुल यांच्या मनातील बाब अखेर त्यांच्या बोलण्यातूून बाहेर आली. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच देश पुन्हा निवड करेल, असा ठाम विश्वासही हुसेन यांनी बोलून दाखवला. दरम्यान, भाजपचे आणखी एक नेते आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांनी पंतप्रधानपदाविषयीच्या वक्तव्याबद्दल राहुल यांची तुलना थेट मुंगेरीलाल या कायम स्वप्न पाहणाऱ्या एका हास्य मालिकेतील पात्राशी केली. मुंगेरीलालला स्वप्न पाहण्यापासून कुणी मनाई करू शकतो का, असा सवाल प्रधान यांनी केला.