आदनान सामीच्या टीमचा कुवेतमध्ये मनस्ताप…
बॉलिवूडचा गायक आणि संगीतकार अलिकडेच आपल्या टीमसह कुवेतमध्ये गेला होता. तिथे विमानतळावर त्याच्या टीमला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. तिथल्या कर्मचाऱ्यांनी आदनानच्या टीमचा चांगलाच अपमान केला. आपल्या टीमची झालेली ही बदनामी आदनानने भारतात परत आल्यावर व्यक्त केली.
आदनानने ट्विटरवरच्या पोस्टमधून हा सगळझ प्रकार उघड केला आहे. तो आपल्या गायक वादकांच्या टीमसह एका कॉन्सर्टसाठी कुवएतमध्ये गेला होता. कुवेतच्या विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी कोणत्याही कारणास्तव आपल्या टीम सदस्यांना त्रास द्यायल असुरूवात केली. या प्रकरणी कुवएतमधील भारतीय दूतावासाकडेही आदनानने तक्रार केली आहे. त्याचा संताप इतका अनावर झाला होता की त्रास देणाऱ्या विमानतळ कर्मचाऱ्यांवर कारवाईची शिफारस भारतीय दूतावासाने करावी, अशी मागणीही त्याने केली आहे.
याप्रकरणाची माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज घेत आहेत, असे गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी म्हटले आहे. कुवेतमधील भारतीयांनी आदनानचे खूप स्वागत केले आणि आदनानने त्याबद्दल समाधानही व्यक्त केले आहे. आदनानच्या तक्रारीची दखल सुषमा स्वराज यांनी घेतल्याचे कळल्यावर आदनानने आनंदही व्यक्त केला आहे.