परमाणू युद्धाचा धोका टळलेला नाही…
- आता इराणचे निमित्त
वॉशिंग्टन (अमेरिका) – जगावरील परमाणू युद्धाचा धोका टळलेला नाही डोनॉल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन यांच्यातील संभाव्य भेटीमुळे परमाणू युद्धाचा धोका टळल्यासारखे वाटत असले, तरी तो पूर्णपणे टळलेला नाही. आता उत्तर कोरिया कारण नसला, तरी इराण त्यासाठी कारणीभूत होण्याची लक्षणे दिसत आहेत. अमेरिकेबरोबरचा परमाणू करार त्यासाठी कारण होऊ पाहत आहे इराणबरोबरचा परमाणू करार मोडीत काढण्याचा निर्णय डोनॉल्ड ट्रम्प यांनी घेतला असून त्याबाबत इराणने अनेकवेळा चेतावनी दिली आहे.
इराणबाबत अमेरिकेकडून जोरदार घोषणाबाजी चालू आहे, तर इराणनेही स्पष्ट केले आहे, की आपल्या संरक्षणासाठी इराण परमाणु अस्त्रे बनवू शकतो
जर अमेरिकेने परमाणू करार मोडीत काढला, तर ती तिसऱ्या महायुद्धाची नांदी ठरू शकेल, अशी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी भविष्यवाणी केली होती. अमेरिकेने परमाणू करार मोडल्यास होणाऱ्या हानीची जाणीव अनेक देशांना आहे.
अमेरिकेन परमाणू करार रद्द करू नये, असे जर्मनी, फ्रान्स आणि ब्रिटननेही अमेरिकेला आवाहान केले आहे. या संदर्भात फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी हल्लीच अमेरिकेचा दौरा केला होता, तर ब्रिटनचे परराष्ट्र मंत्रीही अमेरिकेला भेट देणार आहेत. परमाणू करारात काही त्रुटी असतीलही; पण तरीही तो रद्द न करता इतर अनेक पर्याय आपल्यासमोर आहेत. इराणकडे परमाणू अस्त्रे नाहीत, वा त्यांचा काही परमाणू कार्यक्रम नाही, या गोष्टीवर आपण विश्वास ठेवू शकतो. असे त्यांनी म्हटले आहे.